संप सुरू पण कर्तव्य आधी; सोलापुरातील डॅाक्टर्स, परिचारिकांचं होतंय कौतुक | Solapur Doctors Protest
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एका गर्भवती महिलेला फिट आल्याने आणण्यात आल होतं. यावेळी संपावर असलेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांनी तत्काळ महिलेच्या मदतीला धावून जात तिला योग्य उपचार दिले.